वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्ताननं त्यांच्या देशात सुरु असलेल्या दहशतवादावर लवकरात लवकर कडक कारवाई करावी, अशी मागणी ट्रम्प सरकारनं दिली आहे. पाकिस्ताननं दहशतवादाचा बिमोड केला नाही तर अमेरिका त्यांच्या पद्धतीनं कारवाई करेल, असा सज्जड दम देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन नुकतेच अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचा दौरा करून गेले आहेत. यानंतर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हीथर नोर्ट यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी आम्ही अनेकवेळा पाकिस्तानला सांगितलं आहे, असं हीथर नोर्ट म्हणाले होते. अमेरिकेनं ७५ दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली आहे. तसंच हक्कानी नेटर्वकवर कडक कारवाई करण्याची मागणीही अमेरिकेकडून होत आहे.