Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नॅशनल असेंब्लीच्या 101 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता तुरूंगातून बाहेर येत इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदाच्या गादीवर बसणार का? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजला (पीएमएल-एन) 75 जागा मिळाल्या. बिलावल झरदारी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 54 जागा मिळाल्या. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) ला 17 जागा मिळाल्या. उर्वरित 12 जागा इतर छोट्या पक्षांनी जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 265 पैकी 133 जागा जिंकाव्या लागतील. अशातच इम्रान खान यांना आणखी 32 जागांचा जुगाड करावा लागणार आहे. मात्र, तुरूंगात असूनही इम्रान खान राजकारणाचे डावपेच कसे आखणार? असा सवाल विचारला जातोय.


लष्कराचं समर्थन कोणाला?


पाकिस्तान आणि लोकशाही याचा लांब लांबपर्यंत संबंध नाही, याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला येतो. पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीत तेथील लष्कराचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे पाकिस्तानची जनता देखीलं कंटाळली आहे. ज्या पक्षाला किंवा नेत्याला लष्कराचा पाठिंबा असतो, त्यालाच सत्तेत बसण्याची संधी मिळते, असं एक समिकरणच आहे. अशातच आता इम्रान खान यांना विजय मिळून देखील टांगा पलटी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 


लष्कराने आपली ताकद नवाझ शरीफ यांच्या पाठीमागे उभी केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवाझ शरीफ हेच बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, जनतेने कौल इम्रान खान यांनाच दिला अन् त्यांना पुन्हा कॅप्टन म्हणून घोषित केलं. मात्र, आता लष्कर पुन्हा पाकिस्तानच्या सत्तेचा कब्जा मिळवून मार्शल लॉ लावणार का? असा सवाल विचारला जात आहे.


पाकिस्तानमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेत लष्कराची मोठी भूमिका असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष (पीएमएल-एन) पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे इम्रान खान तुरुंगात आहेत आणि त्यांनी तेथूनच त्यांनी सत्तेत परतण्याचे मनसुबे रचले होते. इम्रान खान यांना लोकांचा भक्कम पाठिंबा यंदाच्या निवडणुकीत दिसून आलाय. त्यामुळे पाकिस्तानमधील निवडणूक खेचून होणार हे पक्कं होतं आणि निवडणूक निकालात तेच पहायला मिळालं.


दरम्यान, पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. 266 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तब्बल 5 हजार 121 उमेदवार यावेळी रिंगणात होते. तर जवळपास 12 कोटी लोकांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला होता. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण 336 जागा आहेत. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. उर्वरित 10 जागा राखीव आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन), पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात लढत होती.