पंतप्रधान मोदींच्या न्यूयॉर्क दौऱ्यात निदर्शने करण्याचे पाकिस्तानचा कट
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर असताना तिथे पाकिस्तानतर्फे निदर्शन केली जाणार
इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर असताना तिथे पाकिस्तानतर्फे निदर्शन केली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान सत्तेत असलेल्या तहरीक-ए-इंसाफ संघटना न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींना विरोध दर्शवेल असेल असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर सरकार पाकिस्तानचे सरकार नाराज आहे.
इम्रान खान यांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या समर्थकांना काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात सत्तेत असलेल्या तहरीक-ए-इंसाफ संघटनेने हा मुद्दा जगासमोर न्यायचे ठरवले आहे. न्यूयॉर्कमध्ये विरोध दर्शविण्यासाठी पीटीआयच्या विदेशी संघटनांना निर्देश जारी करण्यात आले आहेत.
यासोबतच इंटनॅशनल चॅप्टरचे सचिव अब्दुल्ला रियार यांच्या बैठकीदरम्यान हे निर्देश देण्यात आले. इम्रान खान यांनी रियार यांना देखील अमेरिकेत पाकिस्तान समुदाय आणि भारतविरोधी मानवाधिकार संघटनांना एकत्र करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानचा निर्णय
जम्मू काश्मीर प्रकरणात आखलेल्या कूटनीती अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) नेण्यावर ठाम झाले आहे. आम्ही काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी एआरवाय न्यूज टीव्हीला सांगितले. सर्व कायदेशीर बाबींचा विचार झाल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांना आपले मित्र म्हणत दोघांनी काश्मीर मुद्द्यावर तणाव कमी करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले होते. तसेच जम्मू काश्मीर मुद्द्यावर इम्रान खान यांनी वक्तव्य करताना संयम बाळगण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.
माझे दोन चांगले मित्र पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी व्यापार, राजकारण आणि काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली. परिस्थिती कठीण आहे पण चांगली चर्चा घडल्याचे ट्वीट सोमवारी ट्रम्प यांनी केले.