नवी दिल्ली : काश्मीर ३७० कलम हटविल्यानंतर पाकिस्तान स्थिर मनस्थितीत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. भारत केवळ काश्मीर पर्यंत थांबणार नसून तो POK मध्येही पुढे जाईल असे त्यांनी म्हटले. बालाकोट एअर स्ट्राईक देखील त्यांनी स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने बालाकोटपेक्षा जास्त भयावह प्लान बनवला आहे. बालाकोटपेक्षाही मोठी कारवाई पीओकेमध्ये भारत करेल. जर युद्ध झाले तर याची जबाबदारी भारताची असेल. आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ असेही इम्रान खान म्हणाले. 



भारताने शिमला करार तोडला असल्याचा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अल्वी यांनी केला आहे. पाकिस्तान काश्मीर जनतेची मदत करणे सुरुच ठेवणार आहे. आम्ही भारताच्या निर्णयाविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघात जाणार असल्याचेही ते म्हणाले. 


पीओकेमध्ये रॅली 


इम्रान खान आज १४ ऑगस्टला पीओकेमध्ये रॅली काढणार आहेत. पाकिस्तान सरकार १५ ऑगस्टला काळा दिवस साजरा करणार आहे. १५ ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये भारत विरोधी रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे. या रॅलीत बुरहान वानी आणि यासीन मलिकच्या समर्थनात घोषणा दिले जाण्याची देखील शक्यता आहे. 


पाकिस्तान व्याप्त काश्मीरला पाकिस्तान वेगळा देश मानतो. इम्रान खान सोबत अनेक मंत्री देखील उपस्थित राहणार आहे. येथील नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याचं देखील कळतं आहे.