मुंबई : काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ असं म्हणत युद्धजन्य हालचाली करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सचिवालयात अंधार पसरण्याची शक्यता आहे. कारण, ठरतंय ते म्हणते थकलेली वीज बिलाची रक्कम. लाखोंच्या घरात वीजेच्या बिलाची देय रक्कम न भरल्यामुळे त्यांच्या कार्यालयाचा या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

The Islamabad Electric Supply Company (IESCO) द इस्लामाबाद इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी म्हणजेच 'इस्को'कडून संबंधित प्रकरणी बुधवारी एक नोटीस बजावण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या वृत्तांनुसार सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या पंतप्रधांनांच्याकडून 'इस्को'ला ४१ लाख रुपयांची रक्कम दिली जाणं अपेक्षित आहे. गेल्या महिन्यापर्यंत ही रक्कम ३५ लाख रुपयांच्या घरात होती. 


'इस्को'शी संबंधीत सूत्रांच्या माहितीनुसार वारंवार नोटीस देऊनही पंतप्रधान कार्यालयाकडून त्यावर कोणतंच पाऊल उचललं गेलं नाही, शिवाय थकलेली रक्कमही भरण्यात आलेली नाही. हीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहिल्यास संपूर्ण कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असा इशाराही या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे.