कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानचा मोठा निर्णय, भारताची पुन्हा निराशा
भारत सरकारनं पाकिस्तानकडे कुलभूषणच्या सुटकेची मागणी करत त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. परंतु, यानंतरही कुलभूषणच्या अडचणींत सतत वाढ होताना दिसतेय. आता पाकिस्ताननं कुलभूषण संदर्भात पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानंतर कुलभूषणच्या भारतात परतण्याच्या शक्यता आता आणखीनच धूसर झालीय.
भारत सरकारनं पाकिस्तानकडे कुलभूषणच्या सुटकेची मागणी करत त्याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. परंतु, पाकिस्तानानं पुन्हा एकदा भारताची ही मागणी धुडकावून लावलीय. त्यामुळे, भारतासाठी एक मोठा धक्काच आहे.
पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारत आणि कुलभूषणच्या कुटंबाची निराशा झालीय. हेरगिराच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असणारे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरोधात दहशतवादी कारवाईचे आरोप पाकिस्ताननं केलेत. कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'साठी कार्यरत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केलाय. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात १३ एप्रिल रोजी सुनावणी झाली होती.