Rich Girl Fall In Love With Driver: युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. कधी कोणावर कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. अशी अनेक उदाहरणं आपण आसपास पाहात असतो. प्रेमाला कसलंच बंधन नसतं. खऱ्या प्रेमाला जात-पात, श्रीमंती-गरीब यात कोणताच फरक जाणवत नाही. असंच एक प्रेमाचं प्रकरण पाकिस्तानमधून समोर आलं आहे. एका कोट्यधीश मुलीनं आपल्या ड्रायव्हरच्या प्रेमात (Driver love story) पडली आणि लग्नही केलं. ही मुलगी ड्रायव्हरच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली होती की घरच्यांचा विरोध झुगारून आपल्या प्रेमावर ठाम राहिली. एका मुलाखतीत मुलीनं आपल्या प्रेमाचं खरं कारण सांगितलं. हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आपल्या ड्रायव्हरकडून मी गाडी चालवायला शिकत होती. तेव्हा त्याने गाडीचे गियर ज्या अंदाजात बदलले. तो अंदाज मला सर्वात जास्त भावला. त्यामुळे मी त्याच्या प्रेमात पडली. तेव्हाच मी विचार केला की लग्न करेन तर याच्याशीच", असं तरुणीनं एका मुलाखतीत सांगितलं. मुलीच्या म्हणण्यानुसार, गाडीचा गियर बदलण्याव्यतिरिक्त तिला तिच्या नवऱ्याच्या सर्व सवयी आवडतात. मुलीने सांगितले की, ड्रायव्हिंग शिकत असताना तिला अनेक वेळा ड्रायव्हरचा हात धरायचा होता. 


Zoom Meeting मध्ये बॉसचा 'तो' आदेश कर्मचाऱ्याने झुगारला, म्हणाला, "घर म्हणजे..."


मुलाखती दरम्यान तरुणीला पतीसाठी कोणतं गाणं डेडिकेट करशील? असं विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की, 'हम तुम एक कमरे में बंद हों...' हे गाणं गुणगुणू लागली. सोशल मीडियावर ही प्रेम कहाणी चांगलीच चर्चेत आहेत.