अमेरिका : पाकिस्तानने आपल्या देशात सुरक्षित असलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूद करा असा असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी दिला आहे. असे सीआईएचे निर्देशक माइक पोम्पियो यांनी सांगितले.


पाकला अपयश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्क दहशतवादी समूहासोबतच त्यांना आश्रय देणारे नष्ट होण्यास पाकला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.


त्यामूळे अरब डॉलरच्या सुरक्षेची मदत थांबविण्याचा निर्णय अमेरिकेने केला आहे. 


अमेरिकेसाठी धोका 


'सीबीएस'नुसार, पोम्पियो म्हणाले, देशांतर्गत दहशतवाद्यांना आश्रय देण पाकिस्तानकडून सुरूच आहे, अमेरिकेसाठी हा धोका आहे. हा प्रकार चालणार नाही असे आम्ही पाकिस्तानला सुचित करु इच्छितो. 


समस्या सोडवावी 


जर त्यांनी ही समस्या सोडवली तर त्यांच्यासोबत काम करायला आम्हाला नक्की आवडेल असेही त्यांनी सांगितले.