Pakistan : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. ही उक्ती या जोडप्याला तंतोतंत लागू होते. पाकिस्तानातली ही 24 वर्षांची तरूणी चक्क तिच्या वडिलांच्या वयाच्या बस ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे त्यांनी लग्नही केलंय. बस ड्रायव्हर आणि तिच्या वयात मोठं अंतर आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून दोघांनीही लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी यूट्यूबर सय्यद बासित अलीनं या जोडप्याची मुलाखत घेतली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या दोघांची लव्ह स्टोरी हटके अशीच आहे. 


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सादिक हा बस चालवतो. त्याच्या बसमधून एक 24 वर्षीय तरुणी दररोज प्रवास करायची.. ती शेवटच्या स्टपवर उतरत असल्यानं बसमध्ये बराच वेळ असायची. प्रवासात सादिक बसमध्ये जुनी गाणी वाजवायचा. तिला याच गाण्यांची भुरळ पडली. हळूहळू ती बस ड्रायव्हर सादिकशी बोलू लागली. 



एक दिवस तिनं हिंमत करून सादिकसमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. सादिकनंही तिला लागलीच होकार दिला आणि दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकायचं ठरवलं. अलिकडेच दोघांचा निकाह पार पडला. पाकिस्तानातच्या सोशल मीडियात हे जोडपं चांगलच चर्चेत आलंय.