नवी दिल्ली : पाकिस्तानी जनतेमध्ये सध्या एवढा असंतोष आणि अस्वस्थता आहे की लवकरच पाकिस्तानचे तुकडे होणार की काय, अशी स्थिती आहे. सिंध प्रांतात निघालेले मोर्चे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारे देणारे आहेत. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले हे मोर्चे आणि घोषणाबाजी, गल्ल्या, मोहल्ले, बाजारातून असे शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. सिंधमधल्या सानमध्ये गेल्या महिनाभरापासून असा असंतोष आहे. इथल्या लोकांना वेगळं राष्ट्र हवं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात कित्येक वर्षांपासून कट्टरपंथीयांची दहशत आहे. या प्रांतावर कायम लष्करी वर्चस्व राहिल आहे. त्यामुळे सिंध प्रांताची प्रगतीच झाली नाही. सिंधमधले हे मोर्चे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आव्हान देत आहेत.


त्याचवेळी इथली जनता नरेंद्र मोदी यांच्यासह जगातल्या शक्‍तिशाली नेत्यांनी सिंधमध्ये लक्ष घालावं, अशी मागणी करतेय. पाकिस्तानातून जसा बांग्लादेश वेगळा झाला, तसाच सिंधही वेगळा व्हावा, अशी या लोकांची मागणी आहे. सिंधमधला उद्रेक पाहिला तर पाकिस्तानच्या फाळणीची चिन्हं दिसतायत. 



आम्हाला स्वतंत्र करा; अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा सिंधवासियांनी सरकारला दिला आहे. सिंध प्रांतात पंजाबी, ख्रिश्‍चन, हिंदू आणि मुस्लीम अशी संमिश्र लोकसंख्या आहे. अनेकांचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी इम्रान खान सरकारने लष्कराचा वापर करून या लोकांवर जुलूमही केले.


नैसर्गिक सौंदर्य, उत्तम पिकं, नैसर्गिक औषधं, सुका मेवा याची सिंधला देणगी मिळालीय. त्यामुळे सधन असलेला सिंध प्रांत पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कट्टरपंथीयांनी शांत सुंदर सिंधला रक्तरंजित केलं... एकीकडे सिंध पेटलाय... तर दुसरीकडे बलुचिस्तानातही अस्वस्थता आहे.... 


या सगळ्यांना इम्रान खान यांचं नेतृत्व मान्य नाही. उलट पाकिस्तानातल्या या प्रांतांचा भारतावर जास्त विश्वास आहे... सिंध, बलुचिस्तानमधला हा असंतोष पाकिस्तानचे लवकरच तीन तुकडे करणार, अशी शक्यता आहे.