Pakistan Parliament Zartaj Gul Video : तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसल्यानंतर दिल्लीतील (Parliament session) संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू झालाय. मोदी सरकारला NEET पेपर लीकवरून विरोधकांनी घेरलंय. या घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ सुरु आहे. तर आपल्या शेजारी असणारा पाकिस्तानतही संसद अधिवेशन सुरु आहे. या दोन्ही देशातील कामकाज अतिशय वेगळे आहे. पण सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान संसदेतील एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये (trending video) आहे. एका सुंदर महिला खासदाराने संसदेतील वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (pakistan Women MP says parliament speaker look into my eyes video viral Social media trending now)


पाकिस्तान संसदेतील रोमँटिक व्हिडीओ!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान संसदेत कामकाज सुरु असताना एका सुंदर महिला खासदाराने स्पीकर यांना असं काही म्हटलं की, संसदेतील इतर खासदार यांना हसू आवरलं नाही. पाकिस्तान संसदेत रोमँटिक वातावरण पाहिला मिळालं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सध्याचे स्पीकर अयाज सादिक असून संसदेत कामकाज सुरु आहे. एक महिला खासदार आपलं मनोगत व्यक्त असताना अचानक म्हणाली, 'स्पीकर साहेब मला तुमचं लक्ष हवं आहे.' स्पीकर म्हणाले 'होय, कृपया' 


महिला खासदार पुढे म्हणाल्यात की, 'माझ्या नेत्याने मला डोळ्यात बघून बोलायला शिकवलंय. सर, जर डोळाचा संपर्क नसेल तर मी बोलू शकत नाही. त्यानंतर संसदेतील वातावरणात बदल झाला. कोणी काही बोलल्यावर मोहतर्मा म्हणाली, स्पीकर, चष्मा घाला. 


संकोचून स्पीकर म्हणाले की, 'मी ऐकेन.' मी बघणार नाही. मला स्त्रियांशी संपर्क आवडत नाही. हे ऐकून संसदेतील सगळे हसायला लागले. हे पाहून महिला खासदारालाही हसू आवरलं नाही. महिला खासदार पुढे काही बोलण्यापूर्वीच सभापती अयाज सादिक म्हणाले की, मी कोणत्याही महिलेच्या डोळ्यात पाहत नाही. 


कोण आहे जरताज गुल?


स्पीकर यांच्याकडे अशी मागणी करणारी महिला खासदार ही इम्रान खान मंत्रिमंडळातील माजी मंत्री जरताज गुल आहेत. यांनी स्पीकर यांना चष्मा लावायला सांगितलं आणि मग त्याच्याकडे बघायला सांगितलं. मी एक नेता असल्याचे जरताज म्हणाल्या. मला दीड लाख मते मिळाली असून तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाहीस तर मी तुमच्याशी बोलू शकणार नाही. जरताज पुढे म्हणाल्यात, सभापती महोदय, जर तुम्ही 52 टक्के महिलांकडे दुर्लक्ष केलं तर काही निवडकच इथे येऊ शकतात. वक्त्याने पुन्हा सांगितलं की, ते स्त्रीच्या डोळ्यात पाहत नाही. दरम्यान 2024 मध्ये डेरा गाझीमधून पुन्हा निवडून आल्यानंतर जरताज गुल नॅशनल असेंब्लीमध्ये पोहोचल्या आहेत. यापूर्वी, त्या ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2023 पर्यंत नॅशनल असेंब्लीच्या सदस्य होत्या. 



भारतीयांना हा व्हिडीओ अतिशय आवडला असून तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.