Pakistani girl and bus dirver Love Story : प्रेम (love) म्हणजे फक्त एक चिराकाल टिकणारी भावना आहे. प्रेमाला कोणत्याहील प्रकारची बंधनं नसतात असं आपण अनेक वेळा ऐकलं आहे. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल, तर कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता अनेकांच्या विरोधात जावून अनेक जण प्रेमाला महत्त्व देतात. आता देखील एक अशी प्रेमकथा समोर येत आहे, ज्यामध्ये 24 वर्षीय तरुणीने चक्क वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या वयाच्या व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या तरुणीचं नाव शहजागी असून त्या व्यक्तीचं नाव सादीक असं आहे. दोघांची भेट बसमध्ये झाली. शहजादी पंजाब प्रांतातील असूव ती रोज चन्नू ते लाहोर असा प्रवास करते. याच दरम्यान तरुणी रोज बसचालक सादीकला भेटायची. (Pakistani girl and bus driver Love Story)


वाचा | 'मी हिंदू असतो तर माझं नाव...', Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल 


बसमध्ये जुनी गाणी ऐकण्याचा सादीकला छंद होता. यामुळे शहजादी 52 वर्षीय सादीकच्या प्रेमात पडली. शिवाय शहजादीला सादीकची वागणूक त्याच्या गाडी चालवण्याचा अंदाज प्रचंड आवडायचा. सादीकच्या (love story hindi) याच गोष्टींमुळे शहजादी त्याच्या प्रेमात पडली. महत्त्वाचं म्हणजे खुद्द शहजादीने सादीकला प्रपोज केलं. (romantic love story)



शहजादीने प्रेम व्यक्त केल्यानंतर सादीकने देखील होकार दिला. त्यानंतर सादीक आणि शहजादीने लग्न केलं. आता ज्या बसमध्ये सादीक बसचालक आहे, त्याच बसमध्ये शहजादी बस कंडक्टर म्हणून काम करते. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (love story song)


शहजादी आणि सादीकची लव्हस्टोरी 'सय्यद बासित अली' नावाच्या युजरने यूट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख 37 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय 1 हजारपेक्षा अधिक लोकांनी  व्हिडीओ पाहून लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. (love story novel)