नवी दिल्ली : एका पाकिस्तानी मुळ असलेल्या डॉक्टरवर आयएसआय या दहशतादी संघटनेशी संबध ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मोहम्मद मसूद असे या डॉक्टरचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने आयएसआयसोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली असून अमेरिकेत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद हा पाकिस्तानातील वैद्यकीय परवाना असलेला डॉक्टर आहे. तो एच१ बी विसाचा वापर करुन पूर्व मिनेसोटातील रोचेस्टरच्या मेडीकल क्लिनिकमध्ये रिसर्च कोऑर्डीनेटर म्हणून काम करत होता. अमेरिकेचे वकील एरिका मॅकडॉनल्ड यांनी मसूदविरोधात हे आरोप ठेवले आहेत. १९ मार्च रोजी मसूदला मिनियापॉलिस- सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. 


चौकशीदरम्यान त्याने केलेल्या विधानातून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. इराकमध्ये इस्लामिक स्टेट आणि अल शाम ( आयएसआयएस) तसेच त्यांच्या म्होरक्यांप्रती प्रामाणिक असल्याचे त्याने सांगितले. आयएसआयसाठी लढण्याचे आणि सिरियाला जाण्याची इच्छा त्याने यावेळी व्यक्त केली. 


न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रानुसार त्याने अमेरिकेत एकट्याने हल्ला करण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. कोरोना प्रादुर्भावामुळे जॉर्डनने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमा बंद केल्याने मसूदची ठरलेली योजना बदलली. त्याने मग मिनियापोलिसहून लॉस एंजिलसला जाण्याची योजना आखली. त्यावेळी त्याला अशा व्यक्तीला भेटायचे होते जो मालवाहतूक गाडीच्या माध्यमातून आयएसआय भागात पोहोचण्यास मदत करणार होता. 



मसूद १९ मार्चला रोचेस्टरहून मिनियापॉलिस येथे पोहोचला. तिथून तो लॉस एंजिलसला जाण्यासाठी विमानात बसणार होता. इतक्यात एफबीआयच्या संयुक्त दहशतवादविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले.