Pakistan Girl Dance Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्यक्ती एका दिवसात स्टार बनते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून एका पाकिस्तानी तरुणीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Trending Video) नेटकरी या व्हिडिओला खूप लाइक आणि फॉरवर्ड करत आहेत. जाणून घेऊया कोण आहे ही पाकिस्तानी तरुणी, जिच्या व्हिडीओनं लोकांची मने जिंकली? (Pakistani Girl Dance Video) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी मुलगी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' (Mera Dil Yeh Pukare Aaja) या गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नागिन' (Nagin) चित्रपटातील हे गाणं ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला (Vyjayanthimala) यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यात पाकिस्तानी तरुणीचा डान्सच नाही तर तिचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत. (Pakistani Girl Viral Dance Video)


हेही वाचा : Lust Stories 2 : चाहत्यांची उत्सुकता संपली! Kajol, तमन्ना भाटिया आणि तिलोत्तमा सोन यांचा 'लस्ट स्टोरीच 2' लवकरच होणार प्रदर्शित


'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यानं फेम मिळवलेल्या या मुलीचं नाव आयशा असल्याचं सांगितलं जात आहे. आयशानं हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयशा एका लग्नात डान्स करताना दिसत आहे. यावेळी आयशानं हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान कलेला असून तिचे मोकळे केस दिसत आहेत. याशिवाय तिनं हातात कलिरा घातला आहे. हे पाहून आयशा तिच्याच लग्नात डान्स करत असल्याचं दिसतंय. आयशा खूपच सुंदर दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या व्हिडिओमुळे आयशा सोशल मीडिया स्टार झाली आहे. तिच्या डान्सचे सगळीकडे कौतुक होत आहे. आयशाचा हा व्हिडीओ 11 नोव्हेंबरला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. आतापर्यंत याला 60 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.