नवी दिल्ली : सुट्टी कोणाला नाही आवडतं. सुट्टी म्हटलं की सर्वांचीच कळी खुलते. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते ऑफिसमधील नोकरदार मंडळींपर्यंत सर्वांनाच सुट्टी हवीहवीशी वाटते. 


अशी सुट्टी तुम्ही कधी मागितली नसेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेत असताना तर सुट्टीसाठी आपण अनेक बहाणे सांगितले असतील. पोटात दुखतंय, ताप आलाय, अशा अनेक थापा आपण मारल्या. पण पाकिस्तानातील एका विद्यार्थ्यानं सुट्टी मिळावी म्हणून शिक्षकांपुढे असा काही सुट्टीचा अर्ज सादर केला. तो ही गाऊन...



 व्हिडिओ शेअर


त्याचा व्हिडिओ पाकिस्तानी गायक शेहझाद रॉय यानं हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात हा मुलगा गाऊन रजेचा अर्ज शिक्षकांसमोर सादर करत आहे. इतकंच नाही तर अर्जात पूर्णविराम, स्वल्पविराम, परिच्छेद कुठे आहे हेही त्याने त्याच्या गाण्यात सांगितलं. रजेचा हा भन्नाट अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर करत लिहीले की, कृपया याला कोणीतरी सुट्टी द्या.