अखेर पाकिस्तानला आली जाग, दहशतवादी मसूद अझरविरुद्ध अटक वॉरंट
`जैश ए मोहम्मद`चा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मौलाना मसूद अझर (JeM chief Masood Azhar) याला पाकिस्तानने (Pakistan) चक्क फरार म्हणून घोषित केले आहे.
अमर काणे / नागपूर / मुंबई : 'जैश ए मोहम्मद'चा (Jaish-e-Mohammad) म्होरक्या मौलाना मसूद अझर (JeM chief Masood Azhar) याला पाकिस्तानने (Pakistan) चक्क फरार म्हणून घोषित केले आहे. यामुळे या कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानात राहून जगभरात दहशतवादी (Pakistan's anti-terrorism) कारवाया घडवणारा मौलाना मसूद अझर. (Masood Azhar) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सनं त्याला कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवलं. त्याच्यावर पाकिस्ताननं कारवाई करावी, अन्यथा आर्थिक बंधनं घालू, असा इशाराही दिला.
या आंतरराष्ट्रीय दबावामुळंच अखेर पाकिस्तानातल्या इम्रान खान सरकारला जाग आलीय. पाकिस्ताननं मसूदविरुद्ध चक्क अटक वॉरंट जारी केलंय. मात्र तो फरार असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे.. तर पाकिस्तानातल्या बहावलपूरमध्येच तो बॉम्ब प्रुफ घरात लपून बसलाय, याकडं भारतीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अझरप्रमाणेच कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार झाकी ऊर रहमान लखवी हे गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात राहून दशतवादी कृत्यांना खतपाणी घालतायत. आजपर्यंत पाकिस्ताननं त्यांच्या कारवायांकडं कानाडोळा केला. पण आता पाकिस्तानला नाइलाजानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करणं भाग पडत आहे. अशीच कारवाई पाकिस्तान दाऊद इब्राहिमविरुद्ध कधी सुरू करणार, असा सवाल आता केला जात आहे.