नवी दिल्ली : भारतात 9India ) घुसखोरी करण्याचा पाकिस्तानचा (Pakistan) आणखी एक प्रयत्न फसला आहे. (Pakistan's attempt to infiltrate India failed) सीमा सुरक्षा दलाला 150 मीटर लांब भुयार सापडले आहे. पाकिस्तानातून खोदण्यात आलेलं हे भुयार भारताच्या हद्दीत उघडते काय आहे या भुयाराचं रहस्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा करणाऱ्या सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानचे डाव हाणून पाडले... त्यामुळं घुसखोरीसाठी पाकिस्ताननं गुप्त भुयार खोदलं होतं. या भुयारातून दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याचा पाकिस्तानचा डाव होता. पण सीमा सुरक्षा दलानं हा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला. पाकिस्तानी सीमेजवळ हीरानगर भागात बीएसएफनं हे गुप्त भुयार शोधून काढले.


सीमेवर सध्या भारतीय सैन्याचा खडा पहारा असतो. त्यामुळं घुसखोरी शक्य होत नसल्यानं पाकिस्तानचा तीळपापड झालाय. पाकिस्तानातून काश्मिरात होणारी घुसखोरांची संख्या घटलीय. आता भुयारांतून दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याची योजनाही सुरक्षा दलानं हाणून पाडली आहे.