नवी दिल्ली : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) चा म्होरक्या दहशतवादी सरगना अबू-बकर अस बगदादी मारला गेल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यानंतर जगभरातील देशांनी यावर प्रतिक्रिया दिली. पण पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बगदादी मारल्या गेल्याची खातरजमा आयएसआयने केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ ऑक्टोबरला आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीवर सीरियात अमेरिकेने हल्ले चढवले. यामध्ये अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी उत्तर सीरियात हल्ला चढवल्याची माहिती तीन बड्या अधिकाऱ्यांनी दिली. यातच अबू-बकर अस बगदादीचा खात्मा झाला. सीरियाच्या उत्तरेकडील इडलीब इथे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.



अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानावर माजी गृहमंत्री रहमान यांना विश्वास नाही. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पण आयसीसने यांदर्भात ठोस माहिती दिली नाही आहे. जर तो तिथेच मारला गेला असेल तर आम्हाला आनंदच आहे. असे ट्विट रेहमान यांनी केले.