अरेरे! पाकिस्तानच्या खात्यात उरले इतकेच रुपये
डोक्यावर ढिगानं कर्ज तर गुर्मी काही जाईना, पाहा दिवाळखोर पाकिस्तानच्या खात्यात किती रुपये
कराची : भारताशेजारी असलेला देश पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आता पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होत आहे. आता हा देश दिवळखोरीत निघेल अशी शक्यता आहे. या संकटातून पाकिस्तान स्वत:ला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
वेगवेगळ्या देशांकडून कर्ज घेण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेसारखी स्थिती आहे. पाकिस्तानवरच कर्ज मोठं होत आहे. परदेशी चलनही काही दिवसांपूरतं शिल्लक राहिलं आहे. श्रीलंकेसारखी बिकट अवस्था पाकिस्तानची होत आहे.
पाकिस्तानच्या डोक्यावर असं किती कर्ज आहे. पाकिस्तानकडे सध्या किती पैसे शिल्लक आहेत ज्यामध्ये देश चालेल? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
स्थानिक वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानच्या डोक्यावर आता 43 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज हे इम्रान खान सरकारच्या काळात झाल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.
इम्रानने आपल्या 3 वर्षांच्या कार्यकाळात 18 लाख कोटी रुपयांचं कर्ज पाकिस्तानवर केलं आहे. तर पाकिस्तानमधील जनतेवर अधिकभार 1400 कोटी रुपयांचं कर्ज आहे.
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे कार्यकारी अधिकारी मुर्तजा सैय्यद यांनी एका कार्यक्रमात धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानवर 70 टक्के कर्ज अजूनही बाकी आहे. त्यांनी जांबिया, श्रीलंकेशी तुलना केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यांनी या देशांवर किती कर्ज आहे याची आकडेवारीही सांगितली.
पाकिस्तानवर गेल्या काही वर्षात कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. विदेशी मुद्रा भांडार देखील 9.3 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी चलन मूल्य 210 पर्यंत पोहोचलं आहे. त्याचबरोबर एकूण महसूलाच्या 40 टक्के रक्कम ही फक्त व्याज भरण्यात जाते. सध्या पाकिस्तानकडे 3.8 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं तारण ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखीन खोलात जात असल्याचं चित्र आहे.