COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ऑस्ट्रेलियातील सिडनीपासून २६० किमी अंतरावर बुरिल लेक हे ठिकाण आहे. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातल्या बिग 4 पार्क प्रवेशद्वाराजवळ असलेल्या तीन मोठ्या झाडांवर अक्षरश: रोज हजारो पोपट बसलेले दिसतात. बुरिक लेकचे व्यवस्थापन कर्मचारी या पोपटांसाठी ब्रेडचे लहान तुकडे,साखरपाणी असं खाद्य ठेवतात. आणि अवघ्या पाच ते दहा मिनिटांच या परिसरात पंचरंगी असे पोपट दाखल होतात.


पोपटांचं हे पंचरंगी असं दृश्य पाहण्यासाठी याठिकाणी अनेक पर्यटक येतात...त्यांनीही हातात खाद्य ठेवलं तर ते त्यांच्याही डोक्यावर बिनधास्तपणे येऊन बसतात...झाडावर, झाडाखाली,जमिनीवर अगदी माणसांच्या खाद्यांवरदेखील हे पोपट मुक्तपणे संचार करतात...१५ ते २० मिनिटं ते तिथे थांबतात खातात मनमुराद फिरतात आणि पुन्हा दुस-या दिवशी याच वेळी याच ठिकाणी येण्याचं वचन देत जणू आकाशी झेप घेतात.


१९६३ सालापासून म्हणजेच जवळपास ४५ वर्षांपासून दररोज दुपारी ३ वाजता हा दृश्य सोहळा इथे पाहायला मिळतोय..ऑस्ट्रेलियातील झी २४ तासचे प्रेक्षक उदय बिन्नीवाले या हा नजारा आपल्या कॅमेरात कैद केलाय...