हाँगकाँग : चीनच्या एका प्रवाशाला विमानात प्रवासादरम्यान गुदमरल्यासारखे व्हायला लागल्याने त्याने विमानाचा इमरजन्सी दरवाजा उघडल्याची घटना घडलीये. विमान लँड झाल्यानंर या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याला अधिकाऱ्यांनी ११ हजार डॉलर(७.५ लाख रुपये) दंड ठोठावण्यात आला. या प्रवाशाने चीनच्या हनान प्रांतातील सिंचुआन येथून विमानप्रवास सुरु केला होता. चेन असे या प्रवाशाचे नाव आहे. विमान लँड करत असताना चेनला गुदमरल्यासारखे व्हायला लागले त्यामुळे त्याने इमरजन्सी दरवाजा उघडला. यामुळे विमान काही काळासाठी अनियंत्रित झाल्याने डगमगायला लागले. 


चुकीने उघडला दरवाजा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ वर्षीय चेन म्हणाला, विमानाच्या खिडकीच्या ज्या हँडलला पकडले होते ती खिडकी इमरजन्सी दरवाजाशी जोडलेली होती याचा अंदाज नव्हता. तो हँडल खेचला असता दरवाजा उघडला. विमानात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे खिडकीचा हँडल खाली केला मात्र त्यामुळे दरवाजा उघडला. या प्रकाराने मीही घाबरलो. 


१५ दिवस ताब्यात ठेवणार


क्रू मेंबरने याची माहिती पोलिसांना दिली असून त्याला १५ दिवस ताब्यात ठेवले जाणार आहे. एअरलाईनने याप्रकरणी तपासाचे आदेश दिलेत. 


याआधीही घडल्यात अशा घटना


चीनमध्ये याआधीही अशा घटना घडल्या आहेत. २०१४मध्ये बँकॉकहून नानजिंगला जाणाऱ्या एका विमानाक चीनी महिला प्रवाशाने फ्लाईट अटेंडंटवर गरम पाणी आणि न्यूडल्स फेकले होते. हे विमान माघारी फिरवण्यात आले होते.