American Diamond Mine : हिरे किंवा सोनं शोधण्यासाठी जगभरातील खाणींमध्ये शोधमोहिमा सुरू आहेत. खाणीत हिरे किंवा सोनं शोधायचं असेल तर त्यासाठी खूप खर्चही करावा लागतो. मात्र अमेरिकेत एक अशी खाण आहे जिथं हिरे शोधण्यासाठी कोणतीच परवानगी लागत नाही. हिरे शोधण्यासाठी खाण मालकांनं सर्वांना खुली परवानगी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरे आणि सोनं खाणीत सापडतं. त्यासाठी वर्षानुवर्षे शोधमोहिमा सुरू असतात. सरकारी परवानग्या लागतात त्या वेगळ्याच. मात्र, अमेरिकेत एक अशी खाण आहे जिथं कुणीही येऊन हिरे शोधू शकतं. कारण खाण मालकानं लोकांना तशी परवानगीच दिलीय. अमेरिकेतील अरकनसास राज्यात ही खाण आहे. या खाणीचं नाव क्रेटर ऑफ डायमंड्स स्टेट पार्क असं आहे. सामान्यतला सामान्य माणूस सुध्दा इथं येऊन हिरे शोधू शकतो.


37 एकर क्षेत्रात असलेल्या या खाणीत ज्वालामुखीय क्रेटर असून तिथंच हिरे शोधले जातात. इथं येणाऱ्या लोकांना सर्वात आधी हिऱ्यांची माहिती दिली जाते. त्यानंतर नेमके कुठल्या भागात हिरे शोधायचे याची माहिती दिली जाते. खोदकामसाठी लागणारं पारंपारिक साहित्य आणण्याची परवानगी आहे किंवा ते इथं भाड्यानेही उपलब्ध करून दिलं जातं. केवळ विजेवर किंवा बॅटरीवर चालणाऱ्या ड्रिल मशीन आणि इतर सहित्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.


आधी या जागेचं नाव क्रेटर ऑफ डायमंड असं होतं. 1972 मध्ये त्याचं नाव आरकनसास स्टेट पार्क असं करण्यात आलं. इथं आतापर्यंत 35 हजाराहून अधिक हिरे शोधण्यात आले आहेत. याच खाणीत  40.23 करेटचा अंकल सैम हिराही सापडलाय. अमेरिकेत आतापर्यंत सापडलेल्या हिऱ्यांमध्ये तो सर्वात मोठा हिरा आहे.


याशिवाय 16.37 कैरेट, 15.33 कैरेट और 8.52 कैरेटचे हिरे देखील इथं सापडले आहेत. इथे येणारे लोक पिकनिकचा आनंदही घेऊ शकतात. इथं एक गिफ्ट शॉप, टेंट साइट आणि एक डायमंड स्प्रिंग वॉटर पार्क देखील आहे. केवळ 1 हजार रुपये शुल्क भरून पार्कमध्ये प्रवेश दिला जातो..आणि खोडकामासाठी भाड्याने अवजार हवी असली असल्यास ती देखील 5-5 डॉलरमध्ये उपलब्ध जातात. आता यात काहींचं नशीब फळफळतं तर काहींच्या हाती फक्त मातीच लागते..