मुंबई : व्यक्तीच्या कृती त्याच्या व्यक्तीमत्त्वावर सातत्यानं प्रकाश टाकत असतात. किंबहुना व्यक्तीमत्त्वातील बरेच गुणविशेष सांगत असतात. तुम्हाला माहितीये का, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टीकल इल्युशनमधील या फोटोतून तुम्ही फोन नेमका कसा पकडता, या पर्यायाची निवड करत आपल्याच व्यक्तीमत्त्वाची रहस्य सर्वांसमोर उघड करणार आहात. (Personality Test How you hold your phone will reveales your personality)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही जर पहिल्या पद्धतीमध्ये दाखवण्यात आलेल्या प्रकारे फोन पकडता, जिथं तुमचा अंगठा फोनच्या स्क्रीनवर असतो, तर तुम्ही अजिबातच कशाचीही फिकीर करत नाही. तुम्ही आनंदी व्यक्ती आहात. गरज असेल तेव्हा तुम्ही धोकाही पत्करता. लक्ष्य गाठण्यासाठी मर्यादा ओलांडता. 


फोन पकडण्याच्या दुसऱ्या पर्यायाची तुम्ही निवड केल्यास, तुम्ही अतिशय हुशार आणि इतरांची काळजी करणाऱ्यांपैकी एक आहात. बऱ्याच चुकीच्या कामांना थांबवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. 


तिसऱ्या कृतीप्रमाणे तुम्ही फोन पकडत असल्यास एखाद्या परिस्थितीचा आढावा घेत त्यावर तोडगा काढण्याकडेच तुमचा कल असल्याचं दिसून येतं. एखाद्या सोहळ्याला तुमच्या उपस्थितीनं रंगत येते. जोडीदारावर तुमचं जीवापाड प्रेम असतं. 


तुम्ही चौथ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे फोन पकडता, तर आपल्याच विश्वात रममाण होणाऱ्यांपैकी तुम्ही एक आहात. तुम्ही जे काम हाती घेता, त्यामध्ये यशस्वी होता. नवे मित्र बनवणं म्हणजे तुमचा हातखंड. 


काय मग, तुम्ही कोणत्या प्रकारे फोन पकडता? दिलेलं निरिक्षण सांगतंय ना तुमचे गुणविशेष?