इस्लामाबाद : सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानात आता अटल बिहारी वाजपेयी फॉर्म्यूला वापरला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेज मुशर्रफ हा फॉर्म्यूला वापरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या पाकिस्तानात राजकीय स्थिती अस्थीर असल्यामुळे मुशर्रफ तिथे महाआघाडीचे सरकार स्थापण करण्यासाठी हालचाली करत आहे.


23 राजकीय पक्षांची होणार आघाडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार मुशर्रफ यांचा अटल बिहारी वाजपेई फॉर्म्यूला जर यशस्वी झाला. तर, एक, दोन नव्हे, तब्बल 23 पक्षांची आघाडी होईल आणि जम्बो आघाडीचे सरकार सत्तेवर येईल. सध्या 74 वर्षांचे असलेले परवेज मुशर्रफ हे या महाआघाडीचे निमंत्रक असतील. तसेच, पाकिस्तान अवामी इत्तेहाद (पीएआय) असे या आघाडीचे नाव असेल. पाकिस्तानातील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दुबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुशर्रफ यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य समुहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे.


वाजपेयींच्या रालोआची कॉंग्रेसच्या संपुआला टक्कर


विशेष असे की, भारतातही अटल बिहारी वाजपेयी यांनी आघाडी सरकारचा प्रयोग केला होता. त्यावेळी वाजपेयी यांच्या आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांची संख्या 20 इतकी होती. या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) असे नावही देण्यात आले होते. आजही केंद्रीय राजकारणात ही आघाडी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला टक्कर देते आहे. केंद्रात मोठ्या प्रामाणावर संख्याबळ मिळवूनही भाजने ही आघाडी टिकवली आहे. आज केंद्रात रालोआचेच सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली काम करते आहे.


... तर मला विशेष रस नाही - मुशर्रफ


दरम्यान, पाकिस्तानातील संभाव्य महाआघाडीबद्दल बोलताना मुशर्रफ यांनी म्हटले आहे की, 'एमक्यूएम-पाकिस्तानचे जे आस्तित्व (मूळ रूपात) होते त्याचा आता केवळ काही अवशेष बाकी राहिले आहेत. मात्र, जर त्यांचा पक्ष एकत्र राहात असेल तर, फआरूक सत्तार किंवा मुस्तफा कमाल यांना बदलण्यात मला आजिबात रूची नाही.' दरम्यान, एमक्यूएमने आपला जनाधार केव्हाच हरवलेला आहे, अशी टीकाही मुशर्रफ यांनी केली आहे.