मुंबई : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी जास्त होत राहतात. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 68 रुपये प्रती लीटर आहे. पण असा देखील एक देश आहे जेथे एक रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॅटिन अमेरिकेतील देश व्हेनेजुएलामध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 0.01 डॉलर म्हणजेच 64 पैसे मोजावे लागतात. लोकांना येथे एक लीटर पेट्रोलसाठी फक्त 64 पैसे द्यावे लागतात. या देशात मागील २० वर्षांपासून पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. 


शेजारील देश चीन आणि पाकिस्तान बद्दल बोलायचं झालं तर या देशांमध्येही पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. चीनमध्ये पेट्रोल प्रती लीटर ६२ रुपये आहे तर पाकिस्तानमध्ये पेट्रोल ४६ रुपये प्रती लीटर आहे.


बांग्लादेशमध्ये देखील पेट्रोलची किंमम भारतापेक्षा कमी आहे. सऊदी अरब येथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. येथे पेट्रोल १५.४९ रुपये प्रती लीटर आहे. स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या देशांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.