मुंबई : साउथ कोरियाच्या दौऱ्यात फिलीपींसचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी एका महिलेला सगळ्यांसमोर किस केलं. दुतेर्ते यांच्या या वागण्याने लोकांमध्ये नाराजी आहे. लोकांमध्ये नाराजी पाहता राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, जर महिलांनी सांगितलं तर मी पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. दुतेर्ते यांनी म्हटलं की, 'जर महिलांना राष्ट्राध्यक्षांचं फिलिपीन महिलेला किस करणं आक्षेपार्ह वाटत असेल तर त्यांच्या स्वाक्षऱ्यासह त्यांना पदावरुन हटवण्यासाठी ते याचिका दाखल करु शकतात.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुतेर्ते यांनी म्हटलं की, 'लोकांच्या मनोरंजनासाठी हे केलं गेलं आहे'. पण फेमिनिस्ट कम्युनिटी आणि टीकाकारांनी ही राष्ट्राध्यक्षांची 'अश्लील हरकत' असल्याचं म्हटलं आहे. साउथ कोरियाच्या अधिकृत दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष दुतेर्ते यांनी मीडियासोबत संवाद साधतांना म्हटलं क, 'जर महिलांनी त्यांना पदावरुन हटवण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या तर पदाचा राजीनामा द्यायला तयार आहेत.'



सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो फिरत होते.  दुतेर्ते यांनी प्रेक्षकांमधल्या एका महिलेला त्यांनी पुस्तक देण्याच्या बदल्यात किस करण्यासाठी सांगितलं. दुतेर्ते यांना पाहून ती महिला उत्साहित झाली होती. तिने स्वीकार केलं की 'ती विवाहीत आहे आणि किस करायला तयार आहे.'


दुतेर्ते आपल्या बिनधास्त अॅटीट्यूडसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या समर्थकांचा एक वेगळा समुदाय आहे. दुतेर्ते यांनी म्हटलं की, महिलांनी किस करणं त्यांची स्टाईल आहे. राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी 22 वर्ष ते महापौर होते. महापौर असतांना देखील कॅम्पेन करतांना ते प्रत्येक महिलेला किस करायचे. त्यांनी मीडियाला म्हटलं की, 'समस्या ही आहे की तुम्ही मला ओळखतच नाही.'