नवी दिल्ली : असं म्हणतात की, वेळ चांगली असो किंवा वाईट पण जर तुम्ही मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. असाच काहीसा प्रकार एका पंजाबी व्यावसायिक रुबेन सिंग यांच्यासोबत घडला आहे.


रुबेन सिंग सोशल मीडियात प्रसिद्ध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रुबेन सिंग यांची सोशल मीडियात खूपच चर्चा होत आहे. कारण, त्यांनी एक-दोन नाही तर तब्बल ७ वेगवेगळ्या रंगांच्या रॉल्स रॉयस आणि लक्झरी कार्स खरेदी केल्या आहेत.


Image: Twitter

का खरेदी केल्या वेगवेगळ्या रंगांच्या रॉल्स रॉयस?


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या वेगवेगळ्या रंगांच्या रॉल्स रॉयस या व्यक्तीने का बरं खरेदी केल्या असतील? तर, या मागे कारणही तसचं आहे.


Image: Twitter

कार खरेदी करत दिलं प्रत्युत्तर


ब्रिटनमधील पंजाबी व्यावसायिक असलेल्या रुबेन सिंग यांनी एका ब्रिटीश व्यक्तीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या आलिशान कार खरेदी केल्या आहेत.


Image: Twitter

'मिस अॅटिट्यूड' 


९०च्या दशकात रुबेन सिंग यांचा इंग्लंडमध्ये कपड्यांचा मोठा व्यवसाय होता. त्यांनी हा व्यवसाय अवघ्या १७व्या वर्षात सुरु केला होता. हळूहळू त्यांचा 'मिस अॅटिट्यूड' हा कपड्यांचा ब्रँड सर्वत्र प्रसिद्ध झाला.


Image: Twitter

अशा प्रकारे उडवली खिल्ली


मात्र, दुर्दैवाने २००७ साली त्यांना मोठं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. त्याच दरम्यान एका ब्रिटीश व्यक्तीने त्यांच्या पगडीवरुन खिल्ली उडवली. तु केवळ रंगीबेरंगी पगडी परिधान करु शकतो असं म्हणत रुबेन सिंग यांची खिल्ली उडवली.


रुबेन सिंग यांना या गोष्टीमुळे खूपच त्रास झाला आणि त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरु करण्याचं ठरवलं. इतकचं नाही तर, त्यांनी या ब्रिटीश व्यक्तीला चॅलेंजही केलं की मी जितक्या रंगाच्या पगड्या घालतो तितक्याच रंगांच्या रॉल्स रॉयस खरेदी करुन दाखवेल.




त्यानंतर रुबेन सिंग यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरु केला आणि त्यासोबतच ७ रॉल्स रॉयस कारही खरेदी केल्या ज्या पगडीच्या रंगांच्या आहेत.


रुबेन हे सध्या ऑलडेपा कंपनीचे सीईओ आहेत. त्यांचा व्यवसाय अनेक देशांत पसरला आहे. त्यांना ब्रिटीश बिल गेट्स असंही संबोधलं जातं.