पायलट बॉयफ्रेंडकडून विमानत अजब प्रकार, लाजेनं लाल झाली गर्लफ्रेंड
आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अशी लोक बऱ्याचदा विचित्र गोष्टी करतात.
नवी दिल्ली: प्रेमाड बुडालेली लोक काहीही करू शकतात असं म्हटलं जातं. एका तरुणानं चक्क अजब गोष्ट केली आहे. ज्यामुळे गर्लफ्रेंड लाजेनं चूर झाली. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अशी लोक बऱ्याचदा विचित्र गोष्टी करतात. सध्या एक टिकटॉक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका ट्रेंड करत आहे की आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी तो पाहिला आहे.
एका वैमानिक बॉयफ्रेंडने फ्लाइटमध्ये एक विचित्र घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. विमानत घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विमानातील एक प्रवाशानं हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. वैमानिकाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी खास अनाऊंसमेंट केली आहे.
बॉयफ्रेंड वैमानिकाने अनाऊंसमेंट केली त्यानुसार एक विशेष व्यक्ती आमच्यासोबत विमानातून प्रवास करत आहे. ती माझी गर्लफ्रेंड आहे. तिचे नाव हॅना आहे आणि ती सीट क्रमांक 2C वर बसली आहे. तुमचा प्रवास संपल्यावर, कृपया माझ्यासाठी एक काम करा. विमानातून उतरताना माझ्या गर्लफ्रेंडकडे फिस्ट बम्प, हाई फाइव, पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्स देऊन जा. धन्यवाद, प्रवासात मास्क लावा आपण टेक ऑफ करत आहोत.
वैमानिकानं केलेली ही अनाऊन्समेंट ऐकून गर्लफ्रेंड लाजली. अशा विचित्र अनाऊन्समेंटमुळे गर्लफ्रेंड लाजली पण तिच्या वडिलांना मुलाची ही शैली आवडली असं त्याने सांगितलं आहे. ते म्हणाले की मला वाटलं त्याने प्रपोज केलं पण तसं नाही केलं. ते केलं असतं तर जास्त आवडलं असतं.