नवी दिल्ली : विमानाला पक्षी धडकल्यामुळे पायलटला विमानाची आपातकालीन लँडिंग करावी लागली. पण हे विमान पायलटने रनवेवर नाही तर थेट शेतात उतरवलं. पायलटच्या योग्य निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचले. या विमानात एकूण 233 प्रवासी होते. ज्यामध्ये 23 प्रवाशांना दुखापत झाली. त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानाची ही लँडिग कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. हे विमान मॉस्को येथून उडालं होतं. पण पक्ष्यांचा थवा विमानाला धडकल्याने विमानाला उतरवावं लागलं.


विमान उडण्याच्या स्थितीत नव्हतं. त्यामुळे पायलटने विमान थेट मक्याच्या शेतात उतरवलं. एअरपोर्ट लांब असल्यामुळे पायलटने हा निर्णय घेतला. समुद्र आणि नदीत विमान उतरवल्याच्या घटना ऐकल्या होत्या. पण शेतात विमान उतरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. यात मोठी जोखीम देखील होती.


233 प्रवाशांना घेऊन उडालेलं हे विमान एका छोट्या चुकीमुळे दुर्घटनाग्रस्त ही झालं असतं. यूराल एयरलाईन्सचं हे विमान होतं. विमानाच्या एयरबस 321 च्या इंजिनमध्ये पक्षी फसला होता. ज्यामुळे विमान उडवणं शक्य नव्हतं.


रशियाचे आरोग्य मंत्री यांनी म्हटलं की, या विमानात एकूण 233 प्रवाशी होते. ज्यापैकी 23 जण जखमी झाले आहेत. पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले.