हा तर स्वर्गच! विमानातून पायलटने पाहिले आभाळातील अद्भूत दृश्य, Video एकदा पाहाच
Pilot Captures Incredible Video: निसर्ग कधी कधी चमत्कार दाखवतो हे म्हणतात ते काही खोटं नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Pilot Captures Northen Lights Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. विमानात असताना पायलटने आभाळातील एक विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओतील दृश्य पाहून तुम्हालाही स्वर्गाची अनुभूती येईल.
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. देश विदेशातील लोकप्रिय जागांचे दर्शन तुम्हाला घरबसल्यादेखील मिळते. अलीकडेच असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमानात असलेल्या एका पायलटने त्याच्या कैमेऱ्यात निसर्गाचा अद्भूत चमत्कार कैद केला आहे. हा व्हिडिओ पायलटने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे तर 48 हजार जणांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.
व्हिडिओ शेअर करत त्यावर कॅप्शनही दिलं होतं. पायलटने इन्स्टाग्रामवर लिहलं आहे की, हे पाहून असं वाटतंय की चारही बाजूला रंगीत पडदे लावले आहेत. व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या पायलटचे नाव थॉमस असं आहे. मी सगळ्यात सुंदर ऑरोरा बोरेलिस (नॉर्दन लाइट्स) पाहिल्या. काल रात्रीच खूप सुंदर ऑरोरा बोरेलिस पाहिल्या. हे दुर्लभ दृश्य नेदरलँडवरुनही दिसत होते. हिरव्या आणि लाल रंगाचे चमकदार पडद्यासारखे हे दृष्य दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत पायलटला प्रश्न विचारले आहेत.
पायलट थॉमसला काही जणांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारले आहेत. एका युजरने विचारले आहे की की नॉर्दन लाइट्सच्या आतून विमान चालवता येऊ शकते का? यावर थॉमसने युजर्सला उत्तर देत म्हटलं आहे की, हो का नाही यामुळं काहीच नुकसान होणार नाही. हे सुरक्षित आहे. दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे की, हे किती सुंदर दृश्य आहे. समोर असा नजारा असताना फ्लाइंगवर फोकस करणे कठिण आहे. तिसऱ्या युजरने म्हटलं आहे की, यार, तुझा ऑफिस व्ह्यू माझ्यापेक्षा छान आहे.
नोर्देन लाइट्स म्हणजे काय?
नोर्दन लाइट्स हा अवकाशात दिसणारा निसर्गाचा चमत्कार आहे. नॉर्वेतील हे प्रसिद्ध ठिकाण आहे. ऑरोरा उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर आढळतात. कधीकधी, पृथ्वीच्या वरच्या आवरणात लांबवर हे दृश दिसते. जेव्हा सौर वादळ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी धडकतात तेव्हा त्याचा परिणाम म्हणून भूचुंबकीय वादळ निर्माण होतो. या दरम्यान सौर कण आपल्या वातावरणात प्रवेश करतात त्यांचे पृथ्वीच्या वातावरणातील विविध वायूंशी घर्षण होऊन विशेषत: आइसलँडमधील रेकजाविक आणि नॉर्वेमधील स्वालबार्ड या ठिकाणी हे आश्चर्यकारक ऑरोरा तयार होतात.