नवी दिल्ली : एक दुर्लभ असा गुलाबी हिरा जवळपास 50 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटींना खरेदी केला गेला आहे. प्रति कॅरेट किंमतच्या हिशोबाने या हिऱ्याने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 'लियोनार्डो दा विंची'च्या नावाने प्रसिद्ध असलेला या हिऱ्याचा मंगळवारी जिनेवा येथे लिलाव केला गेला.ब्रिटिश ऑक्शन हाऊस क्रिस्टीजच्या ज्वेलरी डिपार्टमेंटचे हेड राहुल कदाकिया यांनी 18.96 कॅरटच्या या गुलाबी रंगाच्या हिऱ्याचा लिलाव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लिलावात मशहूर जूलर हॅरी विंस्टन यांनी 50 मिलिनय डॉलरचा बोली लावून हा हिरा खरेदी केला. हा सर्वाधिक किंमतीला विकला गेलेला हिरा ठरला आहे.


मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 15 कॅरटचा असाच एक गुलाबी हिरा हाँगकाँगमध्ये 3 कोटी 25 लाखाला विकला गेला होता. 21 लाख 76 हजार डॉलर प्रति कॅरटची यावर बोली लागली होती. गुलाबी रंगाच्या हिऱ्य़ावर लागलेली ही सर्वाधिक बोली होती. हा हिरा जवळपास 100 वर्ष जुना असून दक्षिण आफ्रिकेतील एका खानीत तो सापडला होता.


कदाकिया हा गुलाबी हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांमधला एक हिरा मानला जातो. हा हिरा आधी ओपनहाइमरच्या परिवाराकड होता. ज्यांनी अनेक वर्ष डी बीयर्स डायमंड मायनिंग कंपनी चालवली. आयत आकाराचा हा डायमंड 'फँसी विविड' ग्रेडेड आहे. ज्यामध्ये अनेक रंगाची श्रेणी असते. क्रिस्टी यांनी म्हटलं की, याआधी 19 कॅरेटच्या गुलाबी हिऱ्याचा कधीही लिलाव नाही झाला. आतापर्यंत 10 कॅरटहून अधिक आणि गुलाबी 4 हिऱ्यांचाच लिलाव झाला आहे.