जकार्ता : इंडोनेशियाचं लॉयन एअर विमानाच्य़ा अपघाताशी संबंधित माहिती आता समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, मागच्या सोमवारी समुद्रात क्रॅश झालेलं विमान 600 मील प्रति तासाच्या वेगाने समुद्रात कोसळलं. फ्लाइट-ट्रेकिंग डेटाच्या आधारावर ही माहिती समोर आली आहे. तीन तज्ज्ञांनी असा दावा केला आहे. या विमान दुर्घटनेत विमानातील सर्व 189 लोकांचा मृत्यू झाला होता. य़ा दरम्यान विमानाचे अवशेष आणि मृतदेह शोधणाऱ्या एका पाणबुडेचा देखील मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार फ्लाईट-ट्रॅकिंग कंपनी फ्लाइटरेडार 24 ने दिलेल्या डेटानुसार ही माहिती समोर आली आहे की, बोइंग कंपनीचं हे विमान 45 डिग्रीच्या कोनातून समुद्रात कोसळलं. विमानाला अपघात कसा झाला याबाबत आणखी चौकशी सुरु आहे. सध्या इंडोनेशियाचे अधिकारी यावर काहीही बोलत नाही आहेत. जकार्ता येथून उड्डान झाल्यानंतर काही वेळेतच हे विमान समुद्रात कोसळलं. 


समुद्रातील एका दगडाला जाऊन हे विमान धडकल्याचं देखील बोललं जात आहे. कारण विमानाचा वेग आणि विमानाचे झालेले तुकडे यावरुन याचा अंदाज बांधला जात आहे. बोइंग कंपनीसह अमेरिकेचं फेडरल एविएशन प्रशासन देखील या चौकशीत मदत करत आहे.