Trending News: विमान प्रवासाबद्दल सामान्य माणसाला कायम कुतूहल असतं. आपण आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करावा, असे अनेकांचे स्वप्न असतं. विमान प्रवास हा महाग असतो. मात्र रेल्वे आणि रस्ते वाहतूकपेक्षा तुम्ही एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचता. त्यामुळे अनेक लोक आज विमानाने प्रवास करणे पसंद करतात. कारण यामुळे त्यांचा वेळ वाचतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या विमान प्रवासाची अनेकांना भीती वाटते. त्यांचा मनात अनेक प्रश्न असतात. त्यातील एक मजेशीर प्रश्न म्हणजे उंच आकाशात विमान असल्यास इंधन संपलं तर? असाच काहीसा प्रसंग घडला आहे आणि त्यानंतर विमानातील प्रवाशांचा जीव कंठाशी आला.


नेमकं काय घडलं?


Aer Lingus फ्लाइट नंबर EI779 आकाशात उंच भरारी घेत होती आणि अचानक पायलटच्या लक्षात आलं की विमानातील इंधन संपलं आहे. सहसा असं कधी होतं नाही, कारण ते विमान जेवढं प्रवास करणार असतं तेवढं इंधन त्यात भरलं जातं. मात्र या एयरलाइन कंपनीने इंधनाचा चुकीचा हिशोब लावला. त्यामुळे विमान आकाशात असताना अचानक त्याचं इंधन संपलं. या घटनेनंतर पायलट क्रू मेंबर्ससह सर्व प्रवाश्यांना घाम फुटला. या परिस्थित पायलटची एकच तारांबळ उडाली. विमानातील प्रवाशांना हे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एकच खळबळ माजली. मात्र पायलटने प्रवाशांना समजवं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. 


सर्व प्रवाशी सुखरुप


ही घटना 20 जुलैला घडली आहे. हे विमान Lanzarote वरुन  Dublin जात होती. जेव्हा पायलटच्या लक्षात आलं की विमानातील इंधन संपत आलं आहे. त्यांनी एअर ट्रॉफिक कंट्रोलशी संवाद साधला आणि शॅनन विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं. त्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.