नवी दिल्ली : 8 मार्च 2014 पासून बेपत्ता असलेल्या विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाज देखील गायब झालं आहे.


आधी विमान, मग जहाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलेशिया एयरलाइंसचं विमान एमएच 370 ला शोधण्यासाठी जहाज निघालं होतं. पण ते देखील गायब झालं आहे. एमएच 370 कोलंलांपूर येथून बीजिंगला जाणाऱ्या विमानाचं काय झालं याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.


2014 मध्येही झालेलं बेपत्ता


विमानाला शोधण्यासाठी निघालेलं जहाज देखील आता बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सॅटेलाईटवरुन ही या जहाजाची कोणतीही माहिती मिळत नाही आहे. ही घटना यासाठी गंभीर आहे की, 2014 साली बेपत्ता झालेलं एमएच 370 काही मिनिटात गायब झालं होतं पण त्याचा शोध अजूनही लागलेला नाही.


या जहाजात असलेली ऑटोमॅटिक प्रणाली देखील काम करत नाहीये. हे जहाज शेवटी ऑस्ट्रेलियाच्या बंदराजवळ दिसलं होतं. पण त्यानंतर ते जहाज बेपत्ता झालं आहे.