एकाच वाटेवर चालतायत दोन ग्रह; अवकाशात घडलीये शास्त्रज्ञांनाही हैराण करणारी घटना
एकिकडे (chandrayaan 3) चांद्रयान 3 दर दिवशी एक नवा टप्पा सर करत असतानाच अवकाशातील एका अद्वितीय संशोधनाची माहिती नुकतीच समोर आली आहे. तुम्ही पाहिली का... ?
Trojan Discovery Space News : मागील काही दिवसांपासून अवकाश आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत सर्वसामान्यांमध्येही कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. भारतात निमित्त ठरतंय ते म्हणजे नुकतंच पार पडलेलं चांद्रयान 3 (chadrayaan 3) चं प्रक्षेपण आणि जागतिक स्तरावर या कुतूहलामागे कारण ठरत आहे ते म्हणजे एक असा शोध, ज्यामुळं शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत.
खगोलशास्त्रज्ञांना अवकाशातून एका अशा अद्वितीय घटनेची माहिती मिळाली आहे जी पाहता त्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या माहितीनुसार एक खगोलीय पिंड नुकताच प्रकाशात आला असून, त्याची कक्षा गुरु ग्रहाप्रमाणंच आहे. संशोधकांनी सेंटोरस आकाशगंगेत 370 प्रकाश वर्षे दूर असणाऱ्या पीडीएस 70 सिस्टीमच्या आणखी जवळ पोहोचण्यासाठी दक्षिण अमेरिकन राष्ट्र चिलीच्या अटाकामा लार्ज मिलीमीटर/सबमिलिमीटर ऐरे ऑफ टेलीस्कोप (ALMA) चा वापर केला. या निरीक्षणातून एक महत्त्वाची बाब समोर आली की, दोन्ही एक्सोप्लॅनेटची कक्षा एकच आहे. थोडक्यात ही एक Trojan Discovery आहे. (planets trojan Shares same Orbit With Another Exoplanet Rare Discovery read details )
Trojan Discovery म्हणजे काय?
अवकाशातील या घटनेबाबतची माहिती देताना संबंधिचत निरीक्षणकर्ते आणि संशोधकांच्या माहितीनुसार, साधारम दोन दशकांपूर्वी अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की, समसमान क्षेत्रफळ आणि आकारमान असणारे दोन ग्रह त्यांच्या ताऱ्याच्या भोवती चारही बाजुंनी समान कक्षेतून प्रवास करतात. या ग्रहांना ट्रोजन प्लॅनेट किंवा को ऑर्बिटल प्लॅनेट असं म्हटलं जातं. ट्रोजन साधारण पर्वतीय आकाराचे पिंड असतात ज्यांची कक्षा एखाद्या ग्रहासारखीच असते.
हेसुद्धा वाचा : ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील 'त्या' रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा...
अवकाशात घडतंय काय?
पीडीएस 70 बी आणि पीडीएस 70 सी या नावांनी ओळखले जाणारे गुरु ग्रहाप्रमाणे असणारे दोन ग्रह आधीपासूनच एका ताऱ्याची परिक्रमा करताना दिसत आहेत. पीडीएस 70 बी च्या कक्षेनजीक काही धुळीचे ढग असल्याचंही संशोधनातून उघड झालं आहे. अशी शक्यात वर्तवण्यात येत आहे की, हे नव्या ग्रहाच्या निर्मिचाच एक भाग असू शकतात. अतिशय अद्विती अशा संशोधनावरील हे निरीक्षण बुधवारीच एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यत आलं.
ट्रोजन हा थेट शब्दांमध्ये एक ग्रह नसला तरीही गुणधर्मांमुळं त्याची गणती ग्रह म्हणून केली जाते. पृथ्वीच्या कक्षेत असे अनेक ट्रोजन असून, साधारण 12 हजारांहून अधिक ट्रोजन हे गुरु ग्रहाच्या कक्षेत आहेत असं सांगण्यात येतं.