नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा जगातील बड्या व्यक्तींशी सतत या विषयावर चर्चा करत असतात. गुरुवारी त्यांनी बिल गेट्स यांच्याशी चर्चा केली, बिल गेट्स यांनी या चर्चेबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात जगाला संघटित होण्याची गरज आहे, चर्चेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. यावेळी जगात निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मग ते चाचणी, लस किंवा उपचार क्षेत्र असो.


गुरुवारी या दोघांमध्ये झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाविरूद्धच्या लढाईत भारताच्या जागरूक दृष्टिकोणाबाबत माहिती दिली.



पंतप्रधान मोदींनी बिल गेट्स यांना देशातील लोकांनी सामाजिक अंतर कसे स्वीकारले. कोरोना वॉरियर्सचा आदर, मास्कचा वापर आणि लॉकडाऊनचे नियम कसे पाळले याबाबत सांगितले.


विशेष म्हणजे बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशन सध्या जगभरातील गरीबांना मदत करीत आहे. कोरोना संकटाच्या वेळी, फाउंडेशनने अनेक मोहिमा राबवल्या आहेत. भारतातही बिल गेट्स फाउंडेशन अनेक राज्य सरकारांसमवेत मोहीम राबवितो, अशा परिस्थितीत ही चर्चा खूप महत्वाची होती.


यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी -20 देशांसह सार्क देशांचे प्रमुख तसेच इतर अनेक देशांच्या प्रमुखांशी कोरोना विषाणूच्या परिस्थितीबाबत चर्चा केली.