नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि पीएम मोदी यांच्यात मालदीवच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाली.


मोदी-ट्रंप चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांच्या नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली. याशिवाय अफगानिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर देखील चर्चा झाली. इंडो-पेसेफिक रिजनमध्ये सुरक्षा वाढवण्याबाबतही मोदींनी ट्रंप यांच्याशी चर्चा केली.


व्हाईट हाऊसकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि पीएम मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी मालदीवमधील राजकीय संकटावर चिंता व्यक्त केली. 2018 मधली मोदी आणि ट्रंप यांच्यातली ही पहिली चर्चा होती.


राजकीय तणाव


मालदीवमध्ये सध्या राजकीय तणाव निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. पण मालदीवचे राष्ट्राध्यक्ष यामीन यांच्या सरकारने हे आदेश मानन्यास नकार दिला आहे. मालदीवमध्ये यानंतर यामीन यांनी आणीबाणी घोषित केली आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस अब्दुल्ला सईद आणि न्यायाधीश अली हमीद यांना अटक केली आहे.