नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने एक आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटीश हेराल्डच्या एका पोलमध्ये 2019 मधील जगातील सर्वात ताकदवार नेते म्हणून निवडण्यात आलं आहे. या पोलमध्ये मोदींनी जगातील मोठ्या-मोठ्या नेत्यांना मागे टाकलं आहे. पुतीन, डोनाल्ड ट्रंप आणि शी जिनपिंग यांच्यावर मोदींनी मात केली आहे. या यादीत जगातील 25 हून अधिक नेते होते.


कसं झालं मतदान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदानासाठी सोपी पद्धत नाही वापरली गेली. ब्रिटिश हेराल्डच्या वाचकांना ओटीपीने मतदान अनिवार्य करण्यात आलं होतं. या दरम्यान अनेकदा साईट क्रॅश झाली. कारण प्रत्येक जण आपल्या आवडत्या नेत्याला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत होता.



कोणाला किती मतं?


शनिवारी मतदान संपल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी या पोलमध्ये सर्वात पुढे होते. त्यांना 30.9 टक्के मतदान झालं होतं. पुतीन, डोनाल्ड ट्रंप आणि शी जिनपिंग हे या तुलनेत फार मागे होते. या पोलमध्ये मोदींनंतर दुसऱ्या स्थानी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन होते. त्यांना 29.9 टक्के मतं मिळाली. त्यानंतर 21.9 टक्के लोकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना मतदान केलं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना 18.1 टक्के मतं मिळाली. पंतप्रधान मोदींचा फोटो ब्रिटिश हेराल्ड मॅगजीनच्या जुलै महिन्याच्या अंकावर प्रकाशित होणार आहे. 15 जुलैला हा अंक वाचकांना मिळणार आहे.


ब्रिटीश हेराल्डच्या वेबसाईटवर म्हटलं आहे की, पीएम मोदींना भारतीय लोकांकडून सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 2019 मध्ये दहशतवाद विरोधात आपली भूमिका जगासमोर स्पष्टपणे ठेवणाऱे आणि बालाकोटमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. याशिवाय आयुष्मान भारत, उज्जवला योजना आणि स्वच्छ भारत अभियान यामुळे त्यांच्या लोकप्रियता आणखी वाढली आहे.'