अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन
अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं.
अबुधाबी : अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अबुधाबीतल्या जनतेला मंदिराबाबत आश्वासन दिलं होतं. या भूमीपूजनाच्या निमित्ताने मोदींनी हे आश्वासन पूर्ण केलंय.
दुबईतील ऑपेरा हाऊसमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भूमीपूजन पार पडलं. साडे तीन एकर जागेवर हे मंदिर उभारण्यात येणार असून २०२० पर्यंत हे पूर्णपणे साकारलं जाईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. हे मंदिर मानवतेचं प्रतीक बनेल असं मोदींनी म्हटलंय. तसंच अबुधाबीत मिनी भारताचं प्रतिबिंब दिसत असल्याचे मोदी म्हणालेत.