नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा जगभरातील मीडियासाठी चर्चेची बाब ठरला.  भारतीय पंतप्रधानांचा ७० वर्षांनंतरच्या इस्रायल दौऱ्याचे प्रत्येक देशाने वेगवेगळा अर्थ लावला आहे. पण आपला शेजारी पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी  याचा कसा अर्थ लावला चला आम्ही तुम्हांला सांगतो... 


द ट्रिब्यून एक्स्प्रेस 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी वर्तमानपत्र द ट्रिब्यून एक्स्प्रेसने म्हटले की पाकिस्तानचे सरकार मोदींच्या या दौऱ्यावर नजर ठेऊन आहे. पण पाकिस्तानने शिकले पाहिजे की भारतीय कूटनीतीद्वारे इस्रायल आणि त्यांचा कट्टर विरोधी ईराणशी कसे आपल्या संबंधात संतुलन ठेवत आहे. 


डॉन 


पाकिस्तानचे आणखी एक प्रमुख वर्तमानपत्र डॉन हेडलाइन केली की इस्रायलने मोदीच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकले, तर ईराणने काश्मीरबद्दल चर्चा केली. 


भारतीयांशी बोलले मोदी, इस्रायल यायला ७० वर्ष लागले. 


पाकिस्तानी टीव्ही चॅनल सिटी ४२ 


पाकिस्तानचे टीव्ही चॅनल ४२ ने म्हटले आहे की पाकिस्तानला रोखण्यासाठी इस्रायल भारताला मदत करत आहे. 


पश्चिम आशियाई मीडिया 


अल जजीरा 


कतारच्या अल जजीराने मोदींच्या या दौऱ्याला ऐतिहासिक म्हटले आहे, नव्या सरकारच्या रणनितीमध्ये बदलाचे संकेत असल्याचे म्हटले आहे. भारतातील मागील सरकारांच्या विरूद्ध मोदींनी इस्रायला भरवसा दिला आहे. 


जेरूसलम टाइम्स 


इस्रायलचे वर्तमानपत्र जेरूशलम टाइम्सने मोदींच्या या दौऱ्याने इस्रायल आणि भारत संबंधात बदलाचे संकेत असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षात कोणाचे असे स्वागत करण्यात आले नाही. डोनाल्ड ट्रम्प आल्यावरही इतका उत्साह दाखविण्यात आला नव्हता. 



पाश्चिमात्य देशातील मीडिया 


न्यू यॉर्क टाइम्स 


अमेरिकेतील वर्तमान पत्र न्यू यॉर्क टाइम्सने  पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी संबंध सुधारण्यावर आणि मागील परंपरा तोडण्यावर भर देण्यात आला. 


वॉशिंग्टन पोस्ट 


भारत आणि इस्रायलने संरक्षण आणि व्यापारी संबंधांत वाढ करण्यावर भर दिला आहे.