पंतप्रधान मोदींनी घेतली जर्मनच्या चान्सलरची भेट
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जर्मनचे चान्सलर अँगेला मार्केल यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जर्मनचे चान्सलर अँगेला मार्केल यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये राजकीय सहयोग आणि संबंध वाढवण्यासाठी दोघांमध्य़े चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करत म्हटलं की, 'मैत्रीला आणखी मजबूत करत जर्मनचे चान्सलर आंगेला मर्केल यांनी द्विपक्षीय बैठकीआधी चान्सलरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत केलं.
दोन्ही नेत्यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील सहयोग वाढवण्यासाठी चर्चा केली. यामध्ये त्यांनी पुढे लिहिलं की, हा दौरा राजकीय मैत्री मजबूत करण्यासाठी भारताची असलेली इच्छा दाखवते.
पंतप्रधान मोदी त्यांचा ब्रिटेन दौरा संपवून बर्लिनवा पोहोचले. त्यांनी तेथे राष्ट्रमंडळातील देशांच्या अध्यक्षांसोबत बैठक केली आणि अनेक द्विपक्षीय बैठकींमध्ये भाग घेतला. मोदी यांच्या 3 देशांच्या दौऱ्याचा हा तिसरा आणि शेवटचा दौरा आहे. जर्मनीच्या आधी ते ब्रिटेन आणि स्वीडनला गेले होते.