नवी दिल्ली : इंडोनेशियामध्ये पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित करतांना सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. पीएम मोदींनी भाषणात म्हटलं की, 4 वर्षामध्ये भारताचा सन्मान वाढला आहे. देशात कायदे, कर्यालयं तीच आहेत पण सरकार बदलं म्हणून देश बदला आहे. पीएम मोदींनी मागच्या सरकावर टीका करत म्हटलं की, ते अभिमानाने सांगतात की आम्ही कायदे बनवले आणि मी अभिमानाने सांगतो की आम्ही कायदे कमी केलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच पीएम मोदींनी म्हटलं की, इंडोनेशियाच्या नागरिकांसाठी भारत विनामुल्य 30 दिवसाचा वीजा देईल. मोदींनी म्हटलं की, 'असं असू शकतं की तुमच्यातील अनेक लोकं भारतात आले नसतील मी तुम्हाला आमंत्रित करतोय. पुढच्या वर्षी या आणि कुंभमेळा पाहा.'


ई-वीजावर भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.  इंडोनेशियासह 163 देशांचे लोकं ई-वीजाची सुविधा घेत आहेत. ई-वीजावर भारतात येणाऱ्या पर्यंटकांची संख्या 150 टक्क्यांनी वाढली आहे.