पंतप्रधान मोदी स्पेनच्या दौऱ्यावर, इंग्रजी-स्पॅनिशमध्ये ट्विट
युरोप दौऱ्यावर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झालेत.
माद्रिड : युरोप दौऱ्यावर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये दाखल झालेत.
दोन्ही देशांत आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देणं आणि भारतीय अर्थव्यवस्थेला मजबुती मिळवून देण्यासाठी परदेशातून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पंतप्रधानांचा हा दौरा आयोजित करण्यात आलाय, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. स्पेनमध्ये दाखल झाल्यानंतर इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये मोदींनी ट्विटही केलंय.
स्पेनची राजधानी माद्रीदमध्ये मोदींच्या स्वागतासाठी स्पेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री हजर होते. दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात मोदी स्पेनचे पंतप्रधान मॅरिनो रॉजोय यांच्याशी दोन्ही देशातले व्यापारी, समारिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचे प्रयत्न करणार आहेत.
मोदी हे गेल्या तीन दशकात स्पेनमध्ये जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.