वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड आणि नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. ट्रम्प दहशतवादाशी लढण्यासाठी मोदींना किती साथ देतात ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतंय. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झालीये. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.  


सव्वा कोटी लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली, त्याचा गरीबांना फायदा झालाय. आत्तापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त गरीब लोकांना गॅसचं कनेक्शन दिलंय, अशी माहितीही त्यांनी दिली. भारतानं नुकतेच १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण करुन आणि वजनदार उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करुन आपली ताकत दाखवलीये. सर्जिकल स्ट्राईकवरुन जगात कोणीचं भारतावर प्रश्न उपस्थित केला नाही. भारताचं सामर्थ्य जगाला दिसलंय. अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानवरील हल्ल्यावर टिप्पणी केलीये. भारतात गुंतवणुकीचं सर्वोत्तम वातावरण आहे, असंही मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं.