COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेडरिक्टन : कॅनडातील  फ्रेडरिक्टन शहरात झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आलीय. तर अनेकजण यात जखमी झाले. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. या गोळीबारामुळे परिसरात छावणीचं स्वरुप प्राप्त झालंय. 


पूर्व शहर फ्रेडरिक्टन येथे गोळीबार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कॅनेडियन पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. या गोळीबारात झालेल्या घटनेत चार जण ठार झाले. फ्रेडरिक्टन पोलिसांनी ट्विटरच्या संदेशात म्हटले आहे की, "यावेळी आम्ही या संदर्भात संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहोत. "न्यू ब्रनस्विक प्रांताची राजधानी असलेल्या गोळीबारच्या घटनेची कारणे शोधून काढत आहेत, असे पोलिसांनी स्पष्ट केलेय.


दरम्यान, मागच्या महिन्यात कॅनडातील टोरंटोमध्ये एका बंदुकधाऱ्यानं असाच अंदाधुंद गोळीबार केला होता. आणि यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर १३ जण जखमी झाले होते. नजीकच्या काळात कॅनडात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.