Inspirational Story: एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहेत. आयरन लंग नावाचे हे मशीन असून तिची किंमत तब्बल 600 पाउंड आहे. तर, संपूर्ण आयुष्य या मशीनमध्ये घालवणाऱ्या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्याचे वय 77 इतके आहे. अलेक्झांडरला पोलियो पॉल या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना त्यांना 1952मध्ये पोलियो झाला होता. पॉल यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. सर्वात जास्त काळ आयरन लंगमध्ये राहणारा रुग्ण, म्हणून त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1946 साली पॉलचा जन्म झाला होता. जन्मानंतरच त्याला अनेक कठिण समस्यांचा सामना करावा लागला होता. मागीच वर्षीच त्यांना लोकांनी 132,000 डॉलरची देणगी दिली होती. 1952मध्ये अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण पोलियोची साथ पसरली होती. पोलियोचा संसर्ग मोठ्याप्रमाणात फैलावत होता. त्याकाळी कमीतकमी 58,000 रुग्ण सापडले होते. पीडितांमध्ये सर्वाधिक लहान मुलेच होते. याच काळात पॉल यांना देखील पोलियो झाला होता. त्यांना लकवा मारला होता. मानेच्या खालच्या शरीराची हालचालही करता येत नव्हती. त्यानंतर श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. 


अमेरिकेने 1979 साली देश पोलियो मुक्त झाला असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत पॉलला पोलियोने ग्रासले होते. आजारावर मात देण्यासाठी मग शेवटचा पर्याय म्हणून पॉलला आयरन लंग मशीनमध्ये ठेवण्यात आले. या मशीनचा शोध 1928मध्ये लावण्यात आला. मशीनचा शोध लावल्यानंतर 60च्या आसपास या मशीन बनवणे पुन्हा बंद झाले. दरम्यान, या मशीनचा वापर करणारा पॉल हे एकमेव व्यक्ती आहेत. आता अधिक तंत्रज्ञान विकसित झाले तरीही पॉल यांनी याच मशीनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 


पॉलने एका वृत्तपत्रांना दिलेल्या माहितीनुसार, येत्या काळात तंत्रज्ञान विकसित झाले. मात्र मला माझ्या जुन्या मशीनमध्येच राहायचे आहे. मला त्याची सवय झाली आहे. त्यांनी मशीनच्या बाहेर येऊन श्वास घेणेही शिकलं आहे. याला फ्रॉग ब्रिदींग असं म्हणतात. मशीनमध्ये राहूनही पॉल यांनी त्यांची स्वप्न साकार केली आहेत. त्यांनी त्यांचे शिक्षणही पूर्ण केले आहे व एक पुस्तकही लिहलं आहे. ते त्यांच्या तोंडानी पेंटिगही करतात. 


पॉल यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्याचबरोबर वकिलीपर्यंतचा अभ्यासही केला. त्यांनी कित्येक वर्ष वकिली केली. 2021मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, मी कधीच हार मानली नाही  आणि यापुढंही मानणार नाही. त्यांची ही वाक्ये फारच प्रेरणादायी आहेत.