टोरंटो : काम करताना अनेकांच्या हातून चूका होत असतात. पण एका प्रोफेसरने मुलांना शिकवताना या सर्व सीमा पार केल्या. मुलांचं लेक्चर सुरू असताना त्याने अश्लील व्हिडिओ सुरू केला. 24 सप्टेंबरला ही घटना घडली. जेव्हा युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत होते. ते नेहमीप्रमाणे वर्गात आले.  नियमित लेक्चर सुरु झालं. पण आज काहीतरी वेगळं घडणार आहे याची कल्पना कोणाला नव्हती. तब्बल 500 विद्यार्थी यावेळी लेक्चरला उपस्थित होते. जैविक आणि संज्ञानात्मक मनोविज्ञान हा प्राध्यापकांचा विषय होता. त्यांनी नेहमीप्रमाणे प्रोजेक्टरवर शिकवण्यास सुरुवात केली. इथे काहीतरी भलतंच घडंल. शिकविण्याच्या विषयावर क्लिक करण्याऐवजी प्राध्यापकाने भलतीकडेच क्लिक केलं आणि अश्लील व्हिडिओ सुरू झाला. 


व्हिडिओ व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


व्हिडिओ सुरू झाल्यानंतर नक्की काय सुरू आहे हे काही सेकंद तर प्राध्याआणि विद्यार्थ्यांना कळालंच नाही. प्रोफेसरच्या या कृत्यामुळे विद्यार्थ्यांची मान शरमेनं खाली गेली. यादरम्यान एक विद्यार्थी वर्ग सोडून बाहेरही गेला. एका विद्यार्थ्याने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ समोर आल्यापासून सर्वजण याप्रकाराची खिल्ली उडवत आहेत.