Powassan virus in America: कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्स विषाणूच्या संकटातून जग अजून सावरलं नाही. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना आता आणखी एका विषाणूने दार ठोठावलं आहे. पॉवासन नावाच्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. अमेरिकेत या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य अधिकार्‍यांनी टिक-बोर्न पॉवासन व्हायरसच्या संसर्गामुळे एक महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेली महिला 90 वर्षांची होती आणि ती न्यू लंडनच्या काउंटीमध्ये राहात होती. मे महिन्याच्या सुरुवातीला तिला विषाणूची लागण झाली आणि 17 मे रोजी तिचा मृत्यू झाला आहे. या वर्षी कनेक्टिकटमधील या विषाणूने बाधित होणारी ती दुसरी महिला असल्याचे सांगण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉवासन व्हायरस काय आहे?


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवासन व्हायरस हा फ्लॅव्ही व्हायरस आहे. पॉवासन व्हायरस बहुतेक उत्तर अमेरिका आणि रशियन सुदूर पूर्वमध्ये आढळतात. पॉवासन विषाणूचे नाव ओंटारियोतील पॉवासन शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 1958 मध्ये एका लहान मुलामध्ये हा विषाणू आढळला होता. त्याचा विषाणूमुळे मृत्यू झाला होता. उत्तर अमेरिकेत दोन प्रकारचे पॉवासन विषाणू आढळतात. एक म्हणजे लाइनेज-1 आणि दुसरा लाइनेज-2.


पॉवासन व्हायरस कसा पसरतो?


अमेरिकेच्या आरोग्य विभागानुसार, विषाणूची लागण झालेला किटक चावल्याने पॉवासन व्हायरस रोग होऊ शकतो. 



लक्षणे काय आहेत?


पॉवासन विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. काही लोकांमध्ये फक्त सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. डॉक्टरांच्या मते, या विषाणूचा त्रास झाल्यास ताप, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा, चक्कर येणे, एन्सेफलायटीस, मेंदुज्वर आदी समस्या उद्भवतात. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना डोकेदुखी आणि स्मरणशक्ती कमी होण्याच्या समस्या येतात. या विषाणूमुळे मृत्यूचा धोका कमी आहे.


पॉवासन व्हायरसचा उपचार कसा करावा


जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की त्याला पॉवासन विषाणूची लागण झाली आहे, तर त्याने त्वरित डॉक्टरांना भेटावे. या विषाणूवर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.