Politician Affair With Adopted Son Caught Red Handed By Husband: थायलंडमधील एका महिला नेत्यासंदर्भातील विचित्र प्रकार समोर आला असून सध्या ही महिला चर्चेचा विषय ठरत आहे. सोशलम मीडियावर या महिलेची तुफान चर्चा आहे. या महिलेचे तिने दत्तक घेतलेल्या मुलाबरोबरच अफेअर होतं अशी माहिती समोर आली आहे. 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने ('एससीएमपी'ने) दिलेल्या वृत्तानुसार या 45 वर्षीय महिला नेत्याचं नाव प्रापपोर्न चोईवडकोह (Prapaporn Choeiwadkoh) असं आहे. 


पत्नीला रंगेहाथ पकडण्यासाठी पतीने केलं नाटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रापपोर्न यांना त्यांच्या पतीने दत्त घेतलेल्या फरा महा या 24 वर्षीय मुलाबरोबर बेडरुममध्ये रंगेहाथ पकडलं. फरा महा हा एक माँक म्हणजेच भिक्षू असल्याचीही माहिती समोर येत आहे. प्रापपोर्न यांचे पती ती यांनी फरा आणि प्रापपोर्नला बेडरुममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं. पत्नी व्याभिचारी असल्याचा संक्षय आल्याने ती हे तब्बल 5 तास प्रवास करुन अचानक घरी आले तेव्हा त्यांना समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला. फार आधीपासूनच ती यांना त्यांच्या पत्नीवर संक्षय होता. प्रापपोर्न आणि फरा या दोघांचे प्रेमसंबंध असल्याची शंका असल्याने दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी ती यांनी दौऱ्यावर जात असल्याचं बनाव केल्याचं सांगितलं जात आहे. 


महिला नेत्यानेच मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतलेला


प्रापपोर्न आणि ती यांनी फरा याला मागील वर्षी एका धार्मिक आश्रम शाळेतून दत्तक घेतलं होतं. फराची स्थिती पाहून सहानुभूती वाटल्याने आपण त्याला दत्तक घेऊयात असं प्रापपोर्न यांनीच पतीला सुचवलं होतं. आता प्रापपोर्न यांच्याबरोबरचं संबंध उघड झाल्यानंतर या 24 वर्षीय दत्तक मुलाने पळ काढला असून पोलीस त्याच्या मागावर असल्याची माहिती 'एससीएमपी'ने दिली आहे.


यात काहीतरी गोंधळ वाटतोय


सध्या प्रापपोर्न यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाची थायलंड आणि आजूबाजूच्या देशांमध्ये सोशल मिडीयावर आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. "ही बातमी फारच स्फोटक असून यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. ही एखाद्या सिनेमातली स्टोरी वाटतेय. श्रीमंतांचं जग हे फारच विचित्र असतं," असं एकाने सोशल मीडियावर म्हटलं आहे. "64 वर्षांचा पती, 45 वर्षांची पत्नी आणि 24 वर्षांचा दत्तक मुलगा जो भिक्षू आहे? हा फारच गोंधळ वाटतोय. हा प्रकार मुलगा दत्तक घेण्याऐवजी काहीतरी वेगळाच वाटतोय. चित्रपटांच्या कथेतही एवढा ड्रामा नसतो," असं अन्य एकाने म्हटलं आहे.


अनेक कथित व्हिडीओ व्हायरल


सध्या सोशल मीडियावर प्रापपोर्न यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून हे त्यांना पती ती याने रंगेहाथ पकडल्यानंतर काढल्याचा दावा केला जात आहे. प्रापपोर्न या मध्य थायलंडमधील सुकोंथाई प्रांतातील नेत्या आहेत. मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या आहेत.