मुंबई : आतापर्यंत आपण प्रसूतीबाबत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. जसं की, स्त्रीची रेल्वे प्रसूती झाली किंवा प्रसूती प्रवासात झाली. पण एका स्त्रीने प्रसूतीला जाण्याकरता सायकलचा वापर केला असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर हे खरं आहे. न्यूझीलंडमधील एका सामान्य स्त्रीने नाही तर मंत्री जूली ऐने जेंटरने आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी सायकलवरून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रीन पार्टीची ही खासदार जेंटर सायकलिस्ट देखील आहे. प्रसूतीसाठी आपल्या घरापासून 1 किमी अंतरावर असलेल्या ऑकलँड सिटी हॉस्पिटलला ती सायकलवरूनच पोहोचली. 



तिने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर करून म्हटलं की, मी आणि माझ्या जीवनसाथीने सायकलवरून जाण्याचा निर्णय घेतला. कारण कारने माझ्यासोबत असलेल्यांना जागा नव्हती. पण खरं सांगायच तर सायकलवरून गेल्यामुळे माझा मूड चांगला राहिला. जेंटरचे हे पहिले बाळ आहे.